शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:17 AM

हॅशटॅगचा वापर सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल, असा कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दात हॅशटॅगची कल्पना समोर आणणारे क्रिस मेसिना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहमदाबाद : हॅशटॅगचा वापर सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल, असा कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दात हॅशटॅगची कल्पना समोर आणणारे क्रिस मेसिना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ वर्षांपूर्वी नागरिकांना आॅनलाईन नेटवर्कशी जोडण्यासाठी याचा उपयोग सुरू केला होता. इंटरनेटवरील आगामी मोठी गोष्ट म्हणजे टच स्क्रीनऐवजी ‘व्हाईस बेसड् युसीज’ही असणार आहे, असेही ते म्हणाले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, हॅशटॅगची कल्पना आॅनलाईनच्या एका अशा ठिकाणाची होती जेथे कोणीही चर्चा सुरू करू शकतो आणि अन्य लोक यात सहभागी होऊ शकतात. मूळचे अमेरिकेचे असलेले क्रिस मेसिना असेही म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर वाढत असताना लोकांनी वास्तविक जीवनात संवाद साधण्याची क्षमता हरवून बसायला नको.इंटरनेटवरील आगामी मोठी गोष्ट म्हणजे ‘व्हाईस बेसड् युसीज’ही आहे. हॅशटॅगचा प्रथम वापर करताना मी याची कधी कल्पना केली वा चिंतन केले, गरज नाही; पण मी विचार केला होता की, सोशल मीडिया खूप महत्त्वाचा असेल. २००७ मध्ये इंटरनेटचे युजर्स जेव्हा खूप कमी होते तेव्हा वेबसाईट सुरू करण्यासाठी लोकांना केंद्रीय प्राधिकरणाकडे जावे लागत होते.२४ आॅगस्ट २००७ रोजी त्यांनी हॅशटॅगचा प्रथम उपयोग टिष्ट्वटर टाईमलाईनवर केला होता. त्यानंतर ते टिष्ट्वीटरच्या आॅफिसमध्येही गेले होते आणि आपली आयडिया त्यांना सांगितली; पण त्यावेळी ती फेटाळण्यात आली होती. मात्र, टिष्ट्वटरने आपल्या अंतर्गत व्यवस्थापनात याचा उपयोग सुरू केला. त्यानंतर इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मने याचा स्वीकार केला. (वृत्तसंस्था)अनेक मोहिमांमध्ये वापरला जातो हॅशटॅगआज १२ वर्षांनंतर हॅशटॅग सोशल मीडियावरील एक ताकद झाला आहे. या प्रतीकाचा उपयोग कनेक्टिव्हिटीसाठी केला जात आहे. अगदी # मीटूची मोहीम असो की, # सीएएचे आंदोलन असो, हॅशटॅगचा उपयोग अशा अनेक ठिकाणी केला जात आहे.पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’अंतर्गत संवाद साधला आणि ही चर्चा # विदआऊट फिल्टर होईल, असे स्पष्ट केले. क्रिस मेसिना यांनी म्हटले आहे की, हॅशटॅगच्या मुद्रीकरणाबाबत कधी विचार केला नाही. अन्यथा यामाध्यमातून अब्जावधी कमविता आले असते.

टॅग्स :InternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया