शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

आगळीवेगळी शहरे

By admin | Published: May 29, 2017 1:03 AM

जयपूर शहराला पिंक सिटी म्हणतात. कारण कधीकाळी तेथील बहुतेक घरांच्या भिंती गुलाबी होत्या. असेच एक शहर

सिटी ऑफ ब्ल्यू जयपूर शहराला पिंक सिटी म्हणतात. कारण कधीकाळी तेथील बहुतेक घरांच्या भिंती गुलाबी होत्या. असेच एक शहर मोरोक्कोमध्ये चेफचॉवेन नावाने आहे; परंतु त्याची ओळख ब्लू सिटी अशी आहे. मोरोक्कोतील हे सगळ्यात सुंदर शहर आहे. येथे घरांपासून सगळ्या गोष्टी निळ्या आहेत. या शहराला १९३० मध्ये यहुदी विस्थापितांनी वसवले होते. मोरोक्कोतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी हे एक शहर. या शहरात पर्यटकांसाठी २०० हॉटेल्स आहेत.सिटी आॅफ सोलजिवंत माणसांपेक्षा जास्त संख्येत मृतदेहांचे दफन होते किंवा एखाद्या शहरातील प्रत्येक नागरिक हा आध्यात्मिक आहे, अशी शहरे तुम्हाला माहीत आहेत का? अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोजवळ कोलमा शहरात जिवंत लोकांपेक्षा जास्त संख्येने दफन करण्यात आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. १९०० च्या जवळपास सॅनफ्रान्सिस्कोमध्ये मृतदेहांना दफन करण्यासाठी जागा कमी पडू लागली तेव्हा तेथे मरण पावलेल्यांना येथे दफन केले जाऊ लागले. आज कोलमाची लोकसंख्या सुमारे १,८०० आहे; परंतु १.५ दशलक्ष लोकांच्या कबरी तेथे आहेत. यामुळे या शहराला ‘सिटी आॅफ सोल’ आणि ‘सिटी आॅफ द सायलेंट’ म्हणूनही ओळखले जाते.जमिनीखालचे अत्यंत आधुनिक शहर कुबरआॅस्ट्रेलियात एडिलेडपासून ८४६ किलोमीटर दूर असलेल्या कुबर शहराचा शोध १९१५ मध्ये लागला. हे शहर जमिनीखाली आहे. प्रचंड ऊन आणि उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपण जमिनीखाली का राहू नये, असा विचार तेथील लोकांनी केला व त्यातून या शहराचा विकास झाला. जमिनीच्या खाली लोक राहत असले तरी कोणत्याही महागड्या शहरातील जीवनशैली येथे बघायला मिळेल. येथे चर्च, स्टोअर, गॅलरी, हॉटेल, ऐशआरामी सुविधा उपलब्ध आहेत. हॉलीवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरणही या जमिनीखालच्या शहरात झाले आहे.कैरोतील कचऱ्यासाठी  शहराची कचराकुंडीइजिप्तची राजधानी कैरोतील कचरा टाकण्यासाठी त्याच्या जवळचे गाव कचराकुंडी बनवण्यात आले आहे. २००९ मध्ये कैरोतील कचऱ्याच्या वाढत्या प्रश्नाला सोडवण्यासाठी तो कचरा या जागेत टाकला जाऊ लागला व त्याची ओळख स्लमसिटी बनले. या शहरात जवळपास ६० हजार लोक वास्तव्यास आहेत. शहराच्या प्रत्येक इंचावर कचरा पडलेला दिसतो. २००८ मध्ये स्वाइन फ्लूला आवरण्यासाठी या शहरातील जवळपास साडेतीन लाख डुकरांना मारून टाकण्यात आले होते.विषारी वायूचे शहरजपानचे माऊंट ओयामा शहर मियाकी जिमा बेटावर असून, त्याची लोकसंख्या जवळपास २,८०० आहे. हे शहर टोक्योपासून ११० मैल असून, तेथील रहिवासी अत्यंत असुरक्षित आहेत. येथे विषारी वायूचा एवढा परिणाम होतो की, लोकांचा मृत्यूही होऊ शकतो. जेव्हा तेथील हवेमध्ये विषाचे प्रमाण कमालीचे वाढते त्यावेळी लोकांना त्यांनी घरातच राहावे म्हणून भोंगा वाजवून सावध केले जाते.