न्यू यॉर्क- पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्या कन्या दिना वाडिया यांनी गुरुवारी न्यू यॉर्कमध्ये अखेरच्या श्वास घेतला, वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं आहे. ‘द डॉन’ने वाडिया यांच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्धीस दिलं आहे. मोहम्मद अली जीना आणि रतनबाई पेटिट या दाम्पत्याच्या पोटी दिना यांनी जन्म घेतला होता.दिना यांचा जन्म मोहम्मद अली जिना यांच्या दुस-या पत्नीपासून 15 ऑगस्ट 1919 रोजी झाला होता. त्यानंतर दिना यांनी वयाच्या 17व्या वर्षी पारशी उद्योगपती नेविला वाडिया यांच्याशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना दोन संतती प्राप्ती झाली. वाडिया ग्रुपचे सर्वेसर्वा नस्ली वाडिया हे त्यांचे पुत्र आहेत. परंतु काही कारणास्तव दिना या नेविला वाडियांपासून विभक्त झाल्या. त्यानंतर त्या न्यू यॉर्कमध्ये राहू लागल्या.पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या काळात दिना यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती. दिना यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही सोशल मीडियावरून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मोहम्मद अली जिना यांच्या कन्या दिना वाडिया यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 11:38 PM