उलानबाटर-
लाखो वर्षांपूर्वी डायनासोरनं पृथ्वीवर राज्य केलं, परंतु उल्कापातानंतर पृथ्वीवरील डायलासोर प्रजाती संपुष्टात आली. वैज्ञानिकांना आतापर्यंत डायनासोरच्या अनेक प्रजातींचा शोध लावला आहे. पण आता संशोधकांनी चक्क पोहणारा डायनासोरचं अस्तित्व होतं असं आढळून आलं आहे. नुकत्याच एका अभ्यासात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत. डायनासोरची एक प्रजातीमध्ये पोहण्याची क्षमता होती. मंगोलियामध्ये आढळणारा हा डायनासोर बदकाप्रमाणे पाण्याखाली डुबकी मारून आपली शिकार पकडत असे.
कम्युनिकेशन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात या नवीन प्रजातीचे वर्णन करण्यात आलं आहे. या प्रजातीचं नाव नॅटोव्हेंटर पॉलीडोन्टस असं सांगितलं जात आहे. हे थेरोपॉड डायनासोर तीन बोटांचे होते आणि सुमारे १४५ दशलक्ष ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मंगोलियामध्ये अस्तित्वात होते. दक्षिण कोरियाचे सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी, अल्बर्टा विद्यापीठ आणि मंगोलियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी मिळून डायनासोरच्या या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे.
संशोधकांना आढळून आलं की या नॅटोव्हेंटर डायनासोरमध्ये पाण्याखाली डुबकी मारण्याची क्षमता होती आणि ते बदकांप्रमाणे फासळ्यांची मांडणी करायचे. 'त्यांच्या शरीराच्या आकारावरून असं सूचित होतं की नॅटोव्हेंटर हा बहुधा पोहणारा प्राणी होता', असं संशोधकांचं म्हणणं आहे. नॅटोव्हेंटर हेल्स्राप्टरसारखेच होते. हाल्स्राप्टर ही डायनासोरची एक प्रजाती होती जी फक्त मंगोलियामध्ये सापडली होती.
नॅटोव्हेंटर प्रजातीचं पूर्णपणे एक वेगळं अस्तित्व होतं. त्यामुळे शास्त्रज्ञांना त्यांच्या शरीराच्या आकाराचा अभ्यास करणं सोपं झालं, असं संशोधकांनी सांगितलं. हलजाराप्टर आणि नाटोव्हेंटूर या दोन्ही प्रजाती पाण्यातून पुढे जाण्यासाठी त्यांच्या हातांचा वापर केला असावा. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार या प्राण्याचे मनगट पाहून ते पाण्यात अगदी सहज पोहू शकत होते असा अंदाज लावता येऊ शकतो. या प्राण्याची हाडं खूप बळकट होती जी पाण्यात डुबकी मारणाऱ्या प्राण्यांसाठी खूप महत्वाची बाब असते.