सिडनी : जगाच्या हवाई वाहतुकीतील अत्यंत रहस्यमय बनलेले मलेशिया एअरलाईन्सचे 37क् विमान बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यासाठी सुरुवात होत आहे. भारतीय महासागराच्या एकाकी अशा भागामध्ये शोध घेण्यासाठी खोलवर लाटांच्या खाली नवी उपकरणो सोडली जाणार आहेत.
गो फिनिक्स ही तीन जहाजांची तुकडी ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किना:यापासून दूर अंतरावर या विमानाचे अवशेष शोधेल. ही जहाजे 5 ऑक्टोबर रोजी शोध घ्यायच्या परिसरात दाखल होतील. तथापि, त्यांचे प्रत्यक्ष काम प्रतिकूल हवामानामुळे उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. 8 मार्च 2क्14 रोजी हे विमान 239 जणांना घेऊन क्वालालम्पूर येथून बीजिंगला निघाले होते व नंतर दिसेनासे झाले. समुद्रात शोध घेणा:या दोन जहाजांची किंमत प्रत्येकी 1.5 दशलक्ष डॉलर्स आहे. हे नव्याने शोध घेण्याचे काम इतके अवघड आहे की, आज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा जास्त वापर केला जाईल.
या शोधकामासाठी मलेशिया व ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 6क् दशलक्ष डॉलर्स देणार आहेत. प्रत्येक जहाजावर 25 ते 35 लोक असतील व ते जवळपास 24 तास काम करतील. त्यांना इंधन व अन्य साहित्यासाठी पुन्हा किना:यावर यावे लागेल. (वृत्तसंस्था)