ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - व्यापक व्दिपक्षीय चर्चेचे मुद्दे निश्चित करण्यासाठी पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रसचिवांमध्ये चर्चा होईल अशी माहिती पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र निती सल्लागार सरताझ अझिझ यांनी शुक्रवारी दिली. पाकिस्तानी संसदेमध्ये बोलताना अझिझ यांनी भारतासोबत व्दिपक्षीय चर्चा सुरु करण्यावर विरोधकांनी घेतलेला आक्षेप खोडून काढताना चर्चा पुन्हा सुरु करण्याचचे समर्थन केले.
शांतता, सुरक्षा, जम्मू-काश्मीर, सियाचीन, दहशवाद, आर्थिक संबंधांचा व्दिपक्षीय चर्चेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा पाकिस्तानात सुरु असलेला खटला जलदगतीने चालवण्याचेही भारताला आश्वासन देण्यात आले आहे.