बीजिंग : भारताचा भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवरील दावा बळकट करण्यास चीनने खोडसाळपणा करत आपल्या सैनिकांना लाखो वादग्रस्त नकाशे वितरित केले आहेत. ३० वर्षांनंतर नव्याने नकाशे वितरित केले जाणार आहेत. पीएलए डेलीच्या वृत्तानुसार, सैन्य दलातील सर्व प्रमुख संस्थांना हे नकाशे दिले जातील.चीनी सैन्य दलाच्या सात प्रमुख संस्थांपैकी एक ‘लानझोऊ’ने सैनिकांसाठी दीड कोटींहून अधिक अद्यावत नकाशांचे वाटप केले आहे. सरकारी माध्यमांनी चीनी सैन्यासाठी जारी करण्यात आलेले नकाशे प्रकाशित केले नाहीत. नव्या नकाशात भारताच्या हद्दीतील भाग तथा दक्षिण व पूर्व चीनच्या सागरातील अनेक भाग चीनद्वारा स्वत:च्या हद्दीत दाखवण्यात आल्याचे समजते. (वृत्तसंस्था)
चीनकडून वादग्रस्त नकाशांचे वाटप
By admin | Published: July 19, 2014 2:33 AM