इस्त्राइलमधील (Israel) एक घटस्फोटाची (Divorce) घटना जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाने या प्रकरणावरून इस्त्राइलवर टिकाही केली आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिक नॉम हुपर्टला (Noam Huppert) इस्त्राइल सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कारण त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटाची केस दाखल केलीय. इस्त्राइल कोर्टाने त्यांच्यावरील बंदीची आणि पोटगी रक्कम ठरवली आहे, ज्यावरून वादळ पेटलं आहे.
‘इंडिया डॉट कॉम’ मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, इस्त्राइलच्या कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, नॉम हुपर्ट ३१ डिसेंबर ९९९९ पर्यंत देश साडून जाऊ शकत नाही. म्हणजे पुढील ८ हजार वर्ष त्याला एकप्रकारे कैदेत रहावं लागेल. कोर्टाने असंही सांगितलं की, जर हुपर्टला ही शिक्षा टाळायची असेल त्याने पोटगी म्हणून ३ मिलियन डॉलर म्हणजे ४७ कोटी रूपये द्यावे.
कोर्टाने सांगितलं की, जर ऑस्ट्रेलियन नागरिकाने ३ मिलियन डॉलर दिले तर त्याला शिक्षेतून मुक्ती मिळू शकते. असं केलं नाही तर त्याला इस्त्राइलमधेच राहवं लागेल. याप्रकरणी ब्रिटीश पत्रकार Marianne Azizi ने आवाज उठवला आहे. ती म्हणाली की, अशाप्रकारची अडचण अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांना येऊ शकते. त्यामुळे याबाबत काही करण्याची गरज आहे. ती म्हणाली की, याबाबात दुतावासाकडून काहीच माहिती मिळाली नाही.
२०१२ मध्ये इस्त्राइलमध्ये शिफ्ट झाला होता
ऑस्ट्रेलियात राहणारी ही व्यक्ती २०१२ मध्ये आपल्या दोन मुलांसोबत इस्त्राइलमध्ये शिफ्ट झाली होती. तेव्हा त्याच्या पत्नीने इस्त्राइल कोर्टात त्याच्या विरोधात घटस्फोटाची केस दाखल केली होती. कोर्टाने जो निर्णय दिला तो ऐकून त्याला धक्का बसला. त्याला त्याची फसवणूक झाल्याचं वाटत आहे. कोर्टाने सांगितलं की, नॉम हुपर्ट सुट्टी घालवण्यासाठी आणि काम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही.
ऑस्ट्रेलियन मीडियासोबत बोलताना नॉम हुपर्ट म्हणाला की, 'माझ्याप्रमाणे आणखीही काही लोक आहेत. ज्यांना स्थानिक घटस्फोटासंबंधी कायदे माहीत नसल्याने त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा कठोर कायद्याबाबत जास्तीत जास्त जागरूकता करण्याची गरज आहे'. तो म्हणाला की, आता मी याबाबत आपल्या देशातील दुसऱ्या लोकांना सांगून त्यांना जाळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी काम करणार.