अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये यंदा दिवाळी साजरी करण्यात आली. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अनिवासी भारतीयांना पार्टी दिली. यावेळी बायडेन यांच्या पत्नी डा जिल यांनी तुमच्यामुळेच अमेरिका पुढे जात आहे, असे वक्तव्य केले.
भारतीय अमेरिकनांचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटत आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो, असे बायडेन म्हणाले. हे सर्व आता अमेरिकन संस्कृतीचा भाग बनले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आम्ही अधिकृतपणे दिवाळी साजरी करत आहोत, याचा आनंद असल्याचे बायडेन म्हणाले. या कार्यक्रमाला उप राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिसही उपस्थित होत्या.
मी या ठिकाणाहून बाहेर जाण्यापूर्वी आम्ही प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालणार आहोत. हिंसक अतिरेक हा वाढता धोका आहे. द्वेषाला या देशात सुरक्षित अड्डा बनू देणार नाही, असेही बायडेन म्हणाले. ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान बनणार आहेत. उद्या ते राजाला भेटण्यासाठी जातील. एक कृष्णवर्णीय व्यक्ती महत्वाच्या पदावर जात आहे, हे अभिमानास्पद आहे, असेही बायडेन म्हणाले.