पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला.
सुप्रिम कोर्टाने नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला. त्यानंतर अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचा सामना करून पंतप्रधानपद सोडावे लागणारे इम्रान खान पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांकडून नवे पंतप्रधान म्हणून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय फिरवत सभागृह पुन्हा स्थापित केल्यानंतर विरोधकांकडून आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षातील नेते शाहबाझ खान यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आणि घटनेसोबत उभे राहण्याचा आवाहन केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री शाह मोहम्ंमद कुरेशी यांनी इम्रान खान सरकारची बाजू मांडताना विरोधी पक्षांवर परकीय शक्तींसोबत मिळून कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ झाला. मात्र अखेरीस मतदान होऊन त्यात इम्रान खान सरकारचा पराभव झाला.
सरकार पडण्याचे संकेत मिळू लागल्यावर इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले आणि ते इस्लामाबादेतील आपल्या खासगी निवासस्थानी गेले. त्यानंतर नवे पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांचे नेते आणि पीएमएल-एन चे नेते शाहबाझ शरीफ यांचे नाव निश्चित झाले आहे. इम्रान खान सरकारविरोधात विरोधाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. पण आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहू असं ते म्हणाले होते. त्यामुळे शेवटपर्यंत काही ना काही मार्ग निघेल अशी आशा त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन राजकीय खेळी खेळली असून राजीनामा द्यायचं कबूल केलं आहे, पण त्यासाठी तीन अटी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय आहेत या तीन अटी?
१. पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे की खुर्ची सोडल्यानंतर त्यांना अटक करण्यात येऊ नये. तसेच त्यांच्या कोणत्याही मंत्र्याला अटक करण्यात येऊ नये.
२. दूसरी अट अशी आहे की शहबाज शरीफ यांच्या ठिकाणी दुसरं कोणीतरी पंतप्रधान बनायला हवं.
३. तिसरी अट अशी आहे की त्यांना NAB अंतर्गत अटक करण्यात येऊ नये. व्होटिंग नको तर NRO असावं अशी मागणी त्यांनी केली आहे.