ऑनलाइन लोकमत
काहिरा, दि. 2 - दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीने इराकमध्ये पराभव मान्य केला आहे. संघटनेत आलेल्या दहशतवाद्यांना आपल्या देशात परत जा नाहीतर स्वतःला बॉम्बने उडवून आत्मघाती हल्ला करा असा आदेश बगदादीने दिला आहे.
इराकी मीडियामधील वृत्तांनुसार, इराकच्या मोसूल शहरामध्ये इराकी आणि अमेरिकेच्या सैनिकांनी घेरल्याने बगदादी निराश झालाय. समारोप भाषणामध्ये त्याने आपल्या दहशतवाद्यांना आपल्या देशात परत जा नाहीतर स्वतःला बॉम्बने उडवून आत्मघाती हल्ला करा असा आदेश दिला आहे. त्याचं हे भाषणं रेकॉर्ड करण्यात आलं आसून इतर ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनाही ते एकवण्यात येणार आहे.
रिपोर्ट नुसार, मोसूलमध्ये इराकी लष्कराचा ताबा पुन:प्रस्थापीत होत असल्याचं पाहून बगदादीच्या संघटनेचे कमांडर सीरिया आणि इराकच्या सीमेकडे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. 19 फेब्रुवारीला लष्कराने पश्चिम मोसूलला स्वतंत्र करण्यासाठी नवी रणनिती आखून हल्ले करायला सुरूवात केली आहे. जानेवारी महिन्यात इराक सरकारने 3 महिन्यांच्या लढाईनंतर मोसूलवर ताबा मिळवल्याचं जाहीर केलं होतं.