वॉशिंग्टन : पाकिस्तानकडील अण्वस्त्रे आणि जलसंयंत्रांचा जगाने कधीही विसर पडू देऊ नये, असा स्पष्ट इशारा ब्रिटनचे माजी संरक्षणमंत्री लियाम फॉक्स यांनी दिला. पाकिस्तानकडील जलसंयंत्रांची वर्षाला २४ अण्वस्त्रे निर्मितीची क्षमता आहे.सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजतर्फे येथे आयोजित कार्यक्रमात ते बुधवारी बोलत होते.पाककडील अण्वस्त्रांचा जगाने कधीही विसर पडू देऊ नये. कारण तो देश अस्थिर आहे. सध्या वॉशिंग्टनमध्ये सगळ्यांचे लक्ष इराणवर आहे. पाककडे सध्या १२० अण्वस्त्रे असून गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या जलसंयंत्रांचे काम सुरू झाले असून तेथे वर्षाला २४ अण्वस्त्रे तयार होऊ शकतात. फॉक्स म्हणाले की, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात उभे ठाकले आहोत यात नवे असे काहीच नाही; परंतु याचे स्वरूप बदलते आहे. मुळात आमची काळजी आहे ती पाकसारख्या देशात अण्वस्त्रांच्या होत असलेल्या प्रसाराची. कारण ती शेवटी दहशतवाद्यांच्याच हातात पडणार आहेत.’ (वृत्तसंस्था)
‘पाककडील अण्वस्त्रांचा विसर नको’
By admin | Published: March 05, 2015 11:39 PM