वॉशिंग्टन : पाकिस्तानने भारताला दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अशा धमक्या देणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेने आपली नाराजी पाकिस्तानला कळविली आहे. पाकिस्तानने यापुढेही अशाच धमक्या दिल्या, तर त्याचे गंभरी परिणाम होतील, असेच अमेरिकेने या संदेशातून सूचित केले आहे.आम्ही याबाबत (अणुहल्ल्याच्या धमकीला अमेरिकेचा आक्षेप) त्यांना अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. तथापि, पाकिस्तानला कोणत्या पातळीवर हा संदेश देण्यात आला हे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही. आपला देश भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा उपयोग करू शकतो, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी गेल्या १५ दिवसांत वारंवार म्हटले होते. आसिफ यांच्या या विधानाबाबत विचारले असता हा अधिकारी म्हणाला की, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. जर भारताने आमच्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला नष्ट करू. पाकिस्तानी लष्कर भारताच्या कोणत्याही दुस्साहसाला तोंड देण्यास सज्ज आहे, असे आसिफ यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आमची अण्वस्त्रे शोभेची नाहीत. जर अशी स्थिती निर्माण झाली तर आम्ही त्यांचा उपयोग करून भारताला उद्धवस्त करू, असे पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने ओबामा प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून याला प्रमुख पाकिस्तानी नेतृत्वाचा बेजबाबदारपणा मानले जात आहे. संयुक्त राष्ट्रात पाकला पाठिंबा नाही - भारतसंयुक्त राष्ट्र : पाकव्याप्त काश्मीरातील सर्जिकल हल्ल्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणाऱ्या पाकिस्तानला तेथे कोणाचाही पाठिंबा मिळाला नसल्याचे भारताने म्हटले आहे. शस्त्रसंधीवर लक्ष ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने नियंत्रण रेषेवर प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा गोळीबार पाहिला नसल्याचे दावे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानातील संयुक्त राष्ट्र सैन्य निगराणी गटाने (यूएनएमओजीआयपी) सर्जिकल हल्ल्याबाबत कोणताही गोळीबार प्रत्यक्षपाहिला नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केला होता. अकबरुद्दीन यांनी हा दावा फेटाळून लावला. कोणी पाहिल्याने अगर न पाहिल्याने वस्तुस्थिती बदल नाही, असे अकबरुद्दीन म्हणाले. (वृत्तसंस्था)मुत्सद्देगिरीने मुद्दा सोडवासंयुक्त राष्ट्र : भारत आणि पाकिस्तानने काश्मीरसह आपसातील सर्व मुद्दे चर्चा व मुत्सद्देगिरीद्वारे शांततापूर्ण पद्धतीने सोडवावेत असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी केले आहे. दोन्ही पक्षांनी मान्य असेल तर त्यांच्यात मध्यस्थी करण्याची आपली तयारी असल्याचेही ते म्हणाले. उरी हल्ल्यानंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना आणि वाढत्या तणावाबाबत बान चिंताक्रांत आहेत, असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले. भारत खोटारडा - पाकसीमापार हल्ला केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना सांगितले. संयुक्त राष्ट्रातील पाकच्या कायम प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी बान यांची भेट घेऊन देशाची भुमिका मांडली. वाढता तणाव आणि संकटाची जबाबदारी सर्वस्वी भारतावर आहे, असेही त्या म्हणाल्या. पाकने संयम ठेवला आहे. तथापि, आक्रमकता आणि चिथावणीखोर कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.
अणुहल्ल्याच्या धमक्या देउ नका
By admin | Published: October 02, 2016 1:02 AM