नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. रुग्णालयात जागाच नसल्यानं उपचारांअभावी रुग्ण प्राण सोडत आहेत. तर मरणानंतरही मृतदेहांचे हाल होत आहेत. देशात अशी बिकट परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी एक गंभीर इशारा दिला आहे.कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा धोक्याचा इशारा डब्ल्यूओचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी दिला. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले. श्रीमंत देशांनी आता सर्व लहानग्यांना लस टोचण्याऐवजी कोवॅक्सचे डोस दान करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; गडकरींनी बजावली मोलाची भूमिकाजागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. काही देश त्यांच्याकडील लहानग्यांना लस देऊ इच्छितात. त्यांच्या भावना मी समजू शकतो. पण त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि त्याऐवजी कोवॅक्सला लसी दान कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.कोवॅक्स म्हणजे काय..?कोवॅक्स फॅसिलिटी कोरोना लसींसाठी तयार करण्यात आलेलं एक जागतिक सहयोगी संघटना आहे. कोरोना लसींचं उत्पादन, संशोधन आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी ही संघटना काम करते. या संघटनेचं नेतृत्व GAVI कडून केलं जात आहे.
CoronaVirus News: यंदाचं वर्ष धोक्याचं, कोरोना अधिक जीवघेणा होणार; WHOकडून धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:26 AM