शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

तुम्हाला कॉफीचा चस्का आहे? त्याशिवाय तुम्हाला राहवत नाही?

By admin | Published: June 07, 2017 6:13 PM

-तर मग हे १२ फायदे खास तुमच्याचसाठी. कॉफी पिता पिता वाचा आणि व्हा फ्रेश..

- मयूर पठाडेकॉफी. तुमच्यातले किती जण पितात? आणि कॉफीचे तुम्ही किती अ‍ॅडिक्ट आहात? कॉफी प्याल्याशिवाय तुम्हाला होतच नाही, त्याशिवाय तरतरीच येत नाही असं होतं का? त्याबद्दल तुम्हाला अनेकांनी खबरदारीचा सल्लाही दिला असेल. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका पोहोचतो, हे एव्हाना सगळ्यांनीच ऐकलं आहे आणि त्यांना ते माहीतही आहे, पण याच कॉफीचे अनेक उपयोग आहेत, आणि तुमच्या शरीरावर, आरोग्यावरही त्याचा सकारात्मक उपयोग होतो, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर?..तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी निश्चितच नाही. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांनी कॉफी तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे शोधून काढलं आहे.

 

जगातला खूप मोठा आणि खूप मोठ्या लोकांवर केलेला हा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत.तब्बल ८६ हजार लोकांवर दहा वर्षांपर्यंत हा अभ्यास करण्यात आला. काय आहेत कॉफीचे फायदे?

 

१- कॉफीमुळे तुमच्यातील नकारात्मकता कमी होते.२- तुमच्यातलं डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं.३- कॉफीतल्या कॅफिनमुळे मेंदुतल्या एंझाइम्सला खूप ताकद मिळते. ४- त्यामुळे न्यूट्रॉन्सला संरक्षण मिळतं.५- आपली न्यूट्रॉन्स पॉवर मजबूत होते.६- ह्युमिनिटी पॉवर वाढते.७- कोलेस्टेरॉल कमी होतं.८- आत्महत्येचे विचार कमी होतात.९- हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थनं केलेल्या दुसऱ्या एका अभ्यासानुसार ज्या महिला दिवसभरात चार कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफी पितात, त्यांच्यातलं डिप्रेशन सुमारे वीस टक्क्यांनी कमी होतं.१०- कॉफीमध्ये सुमारे १.८ ग्रॅम फायबर असतं. दिवसाला प्रत्येकानं २० ते ३८ ग्रॅम फायबर प्रत्येकाच्या शरीरात गेलं पाहिजे असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. कॉफीमुळे अनायासे हे फायबर मिळतं.११- याशिवाय २०१५मध्ये केलेला एक अभ्यास सांगतो, कॉफीमुळे तणाव आणि थकान कमी होते.१२- कॉफीमुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या शरीरात होतो.