Nurse Removed The Patients Foot: अमेरिकेतील मेडिकल सिस्टीम जगभरात फेमस आहे. पण तिथूनही अशा काही घटना समोर येतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका नर्सने एका रूग्णाला न विचारता त्याचा पाय कापला. हैराण करणारी बाब म्हणजे नर्सने रूग्णाच्या कुटुंबियांना देखील याबाबत काही सांगितलं नव्हतं. अखेर त्या रूग्णाचा मृत्यू झाला.
ही घटना अमेरिकेतील एका खाजगी हॉस्पिटलमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नर्सचं नाव ब्राउन आहे आणि ही ब्राउन स्प्रिंग व्हॅली हेल्थ अॅन्ड रिहॅब सेंटरमध्ये काम करत होती. यादरम्यान हॉस्पिटलमध्ये काही असे रूग्ण दाखल करण्यात आले जे गंभीर आजाराने पीडित होते. नर्सने स्पष्टीकरण दिलं की, ज्या रूग्णाचा पाय कापला त्याचा मृत्यू होणार होता.
पण या कहाणीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा समजलं की, नर्सने विना परवानगी घेता रूग्णाचा पाय कापला. हे झालं कारण नर्सने तिच्या ज्यूनिअरला सांगितलं की, तिला तिच्या टॅक्सिडर्मि शॉपवर पायाला संरक्षित आणि प्रदर्शित करायचं आहे. पण टॅक्सिडर्मि शॉपवर सामान्यपणे प्राण्यांशी संबंधित वस्तू ठेवल्या जातात. याच पॉइंटवर नर्स फसली.
यानंतर तिने जिवंत रूग्णाचा पाय कापला. काही दिवसांनंतर रूग्णाचा मृत्यू झाला. रूग्णाच्या मृत्यूच्या असामान्य स्थितीच्या कारणामुळे जेव्हा शरीर मेडिकल परीक्षकाकडे पाठवण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलं की, मृत्यूआधीच रूग्णाचा पाय कापण्यात आला होता. सध्या नर्स ने तिचा गुन्हा कबूल केला आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केलं जाईल.