शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Corona Vaccine : धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 3:13 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

वॉशिंग्टन - जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र याच दरम्यान कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे. मेक्सिकोमध्ये  काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. 

अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे. 

डॉक्टर ग्रेगरी यांची प्रकृती चांगली होती. त्यांनी सिगरेट कधीच घेतली नाही. कधी कधी काही प्रमाणात मद्य घेत असे. तसेच दररोज व्यायामही करायचे असं हेईदी यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीमुळे डॉक्टर ग्रेगरी यांचा मृत्यू झाला असं आम्ही मानत नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. डॉक्टरांच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचं फायजरने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत कोणताही साईड इफेक्ट आढळून आला नाही. तीन दिवसानंतर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तपासणी केली असता त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आलं. यानंतर डॉक्टरचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका, कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी

मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला आहे. या महिला डॉक्टरने लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना अशक्तपणा, डोकेदुखी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कार्ला सेसेलिया पेरेज असं महिला डॉक्टरचं नाव असून त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लसीचा दुष्परिणाम झालेल्या डॉक्टर कार्ला पेरेझ यांच्या मेंदूत आणि मणक्यात सूज आली होती. त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. 

कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी

डॉक्टर कार्ला यांना अँटीबायोटीकची एलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्ला यांना अर्धांगवायूचा झटका हा लसीमुळे आला असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र लसीमुळे हा दुष्परिणाम झाला का हे तपासले जात आहे. लसीमुळेच अर्धांगवायूचा झटका आला का हे पाहण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे डॉक्टर कार्ला यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर (Pfizer) लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo) असे या 41 वर्षीय महिलेचे नाव असून फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDeathमृत्यूdoctorडॉक्टर