सैनिकाच्या धडधडत्या हृदयातून काढली गोळी, डॉक्टरांनी वाचवला यूक्रेनच्या जवानाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:07 PM2022-04-12T17:07:16+5:302022-04-12T17:10:18+5:30
Russia-Ukraine War : डॉक्टरांच्या या कामाने सगळेण अवाक् झाले आहेत. मेडिकल हिस्ट्रीमध्ये ही केस नक्कीच लक्षात ठेवली जाईल.
रशिया आणि यूक्रेनचं (Russia-Ukraine War) युद्ध अजूनही सुरूच आहे. अशात दोन्ही देशातील हजारो सैनिकांवर याचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक सैनिक मारले गेले आणि काही गंभीरपणे जखमी आहेत. अशात यूक्रेनच्या एका सैनिकासंबंधी बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या सैनिकाच्या हृदयावर गोळी लागली होती. मात्र, डॉक्टरांच्या टीमने सैनिकाच्या धडधडत्या हृदयातून गोळी काढून त्याचा जीव वाचवला.
डॉक्टरांच्या या कामाने सगळेण अवाक् झाले आहेत. मेडिकल हिस्ट्रीमध्ये ही केस नक्कीच लक्षात ठेवली जाईल. कारण यूक्रेन आणि बेलारूसच्या डॉक्टरांनी मिलून एका सैनिकाचा जीव वाचवण्यासाठी ही फार अवघड अशी सर्जरी केली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, यूक्रेनची राजधान कीवमधील Feofaniya हॉस्पिटलमध्ये या सैनिका गोळी लागल्यावर आणण्यात आलं होतं.
Ukrainian and Belarusian doctors performed a very difficult operation - they took out a bullet stuck in the heart of a Ukrainian serviceman. Among them is the Belarusian doctor Maksim Paulouski who works in Kyiv, #Ukrainepic.twitter.com/lLrkFMlqQd
— Hanna Liubakova (@HannaLiubakova) April 10, 2022
त्याला डॉक्टर लगेच ओपन हार्ट सर्जरीसाठी घेऊन गेले. मीडिया रिपोर्टनुसार, सैनिकाचं हृदय धडधडत होतं आणि त्यातूनच डॉक्टरांनी गोळी काढली. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान हृदय शरीराला बरोबर सप्लाय करत होतं. यूक्रेनसोबतच बेलारूसचे डॉक्टरही या ऑपेरशनमध्ये सहभागी होते. मोठ्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी सैनिकाच्या हृदयातून गोळी काढली आणि त्याचा जीव वाचवला.
सोशल मीडियावर सैनिकाचा त्या डॉक्टरांसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे ज्यांनी त्याचं ऑपरेशन केलं. मृत्यूच्या दारातून परत आल्यावर सैनिक डॉक्टरांना म्हणाला की, तो आपल्या देशासाठी अजूनही लढण्यासाठी तयार आहे. यानंतरही त्याला गंभीर जखम झाली तरी त्याला काही वाटणार नाही. हॅना लियुबाकोवा नावाच्या पत्रकाराने सैनिकाचा आणि डॉक्टरांचा फोटो शेअर केला आहे.