लोकमत व US काउन्सलेटच्या सहकार्यानेनाही. अजिबात नाही. अमेरिका हा देश बहुविध धर्म, विचारधारा, वांशिकता यांचे मिश्रण आहे. आम्ही सर्व लोकांचा सन्मान करतो. धर्म, लिंग, वय, वांशिक भेदभाव आदी मुद्यांपासून संरक्षण देण्यासाठी अमेरिकेत कायदे अस्तित्वात आहेत. अर्जदाराने कोणत्या व्हिसा श्रेणीसाठी अर्ज केला आहे, त्याची पात्रता लक्षात घेत आणि अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार व्हिसाची पडताळणी होते. प्रत्येक व्हिसा अर्जासाठी काही पात्रता निकष आहेत. ज्याची पूर्तता अर्जदाराला करावी लागते. जर त्यांनी त्यांची पूर्तता केली, तर त्यांचा व्हिसा मंजूर होतो. जर ती केली नाही, तर व्हिसा नामंजूर होतो. आमच्या एम्बसी आणि कौन्सुल कार्यालयात अमेरिकी अधिकारी आणि स्थानिक भारतीय अधिकारी, असे दोन्ही देशांतील अधिकारी आहेत.
मुलाखतीच्या खिडकीवर जे अधिकारी बसतात त्यांचे वय, वंश, लिंग, वैयक्तिक श्रद्धा हे वेगवेगळे आहे, तसेच कार्यालयात जो स्थानिक भारतीय कर्मचारीवर्ग आहे तोदेखील विविध राज्यांतील आहे. ते १० पेक्षा जास्त भाषा बोलतात. त्यांचे कौशल्य आणि क्षमता या मुद्यांवरच त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यांची श्रद्धा, वंश किंवा धर्म या मुद्यांवर त्यांची नेमणूक झालेली नाही. नोकरीसाठी किंवा व्हिसा पडताळणीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, याची आम्ही खात्री देतो. आम्ही अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करतो. पात्रतेची निकषपूर्ती करत योग्य त्या व्हिसा प्रकारासाठी अर्ज करणाऱ्या सर्व भारतीयांचे आम्ही स्वागत करतो.
महत्त्वाची सूचना व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचे योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरे आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार, अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचे स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचे www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाइक करा, तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.