नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत सामान्य माणसांपर्यंत लस पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; परंतु काही लोकांना कोरोनावरील लसीऐवजी कुत्र्याची लस दिली गेली, असे जर सांगितले तर? अर्थात, ही घटना चिली देशातील असून, तेथे एका डॉक्टरने असेच काही करूनठेवले.उत्तर चिलीत आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन पशुचिकित्सकांना दंड ठोठावला. त्यांच्यावर आरोप आहे की, कोविड- १९ पासून सुरक्षित राखण्याच्या नावावर ते लोकांना कॅनाईन लस देत होते. एंटोफगास्टा प्रांताचे उप आरोग्य सचिव रोक्साना डिआज यांनी म्हटले की, ‘आमच्या संस्थेचा कार्यकर्ता माहिती मिळाल्यावर कलमा शहरात मारिया फर्नांडा मुनोजच्या पशुचिकित्सा क्लीनिकमध्ये गेला. तेथे लोकांनी मास्क घातलेला नव्हता आणि त्यांनी सांगितले की, आम्हाला लस दिली गेली आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे नाही. हे लोक ज्या लसीबद्दल बोलत होते ती कुत्र्यांची होती.याआधी मुनोजने म्हटले होते की, ‘आम्ही कुत्र्यांतील कोरोना विषाणूची लस स्वत: घेतली आणि आमच्या कर्मचाऱ्यांनाही दिली.’ या लसीमुळे आम्ही अगदी व्यवस्थित आहोत, असा दावाही त्यांनी केला.रोक्साना डिआजने म्हटले की, वस्तुस्थिती ही आहे की, ही लस फारच धोकादायक आहे. मुनोजशिवाय दुसरा एक पशुचिकित्सक कारलोस पारडोदेखील या लसीचा प्रचार करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर आरोग्य विभागाने पारडोला ९,२०० आणि मुनोजला १०,३०० डॉलरचा दंड ठोठावला.
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाn सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी एका न्यायाधीशाची प्रकृती खालावली असून, त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही न्यायाधीश सोमवारपर्यंत नियमित सुनावणी घेत होते. n या न्यायाधीशांसोबतच न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विविध न्यायाधीशांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामात अडचणी निर्माण होत आहेत. ही परिस्थिती पाहता न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार आहे.
n याशिवाय आणखी १५ जणांची नावे कोरोना तपासणीसाठी पाठवली आहेत. काही दिवसांनी नवे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होणार आहे. n कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या न्यायाधीशांनाच या शपथविधीला उपस्थित राहता येणार आहे.