मियामी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी गोपनीय दस्तऐवज आपल्या निवासस्थानी ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दोषी ठरल्यास त्यांना १० वर्षांची शिक्षाही होऊ शकते. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांखाली खटला चालणारे ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
ट्रम्प पुढील आठवड्यात न्यायालयात हजर होणार आहेत, या ऐतिहासिक घटनेपूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागातर्फे त्यांच्यावरील सात आरोप सार्वजनिक करणे अपेक्षित होते. ट्रम्प दोषी ठरल्यास तुरुंगात जाण्याच्या शक्यतेसह त्यांना गंभीर कायदेशीर, राजकीय परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मी निर्दोष आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.