शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

कोर्टाने झटका दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतप्त, घेतला मोठा निर्णय

By admin | Published: February 06, 2017 2:04 PM

सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्यायालयांवर संताप व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर संताप व्यक्त केला आहे.  न्यायपालिका अमेरिकींना धोक्यात टाकू शकते असा इशारा त्यांनी दिला.  याशिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशाप्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. जर काही झालं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोकं देशात येतच आहेत, हे वाईट आहे.  असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं.  
 
आपल्या देशात येणा-यांची चौकशी सावधगिरी बाळगून करा असा आदेश मी दिला आहे. न्यायालय हे काम कठीण करत आहे, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. 
 
वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करु नये असा निर्णय दिला आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मासाच्युसेटस येथील न्यायालयानेही असाच निकाल दिला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या निर्णयावरुन माघार घ्यावी लागली आहे. 
 
 या निर्णयामुळे इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील नागरीकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे या देशातील नागरीकांना 90 दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता.