वॉशिंग्टन : पुढील आठवड्यात विविध राज्यांत होणाऱ्या प्रायमरीपूर्वी अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे सुरू असलेल्या उमेदवारीच्या स्पर्धेत आघाडीवर असणारे डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूजर्सीचे गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आणखी एक गव्हर्नर पॉल लिपेज यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.विशेष म्हणजे ख्रिस किस्टी स्वत: उमेदवारीच्या शर्यतीत होते. आता त्यांनीच ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याने ही एक चकित करणारी घटना घडली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीला पाठिंबा देताना मेन प्रांताचे गव्हर्नर पॉल लिपेज म्हणाले की, मी फार प्रामाणिक आहे. खरे तर माझी गव्हर्नर बनण्याची इच्छा आहे; पण दुर्दैवाने यंदा अमेरिकेत गव्हर्नरपदाची निवडणूक होत नाही. त्यामुळे मी ट्रम्प यांचे समर्थन करतो.टेक्सासमधील फोर्टवर्थ येथे एका रॅलीत बोलताना ख्रिस्टी म्हणाले की, डोनाल्ड नेते असून ते माझ्याप्रमाणेच यशस्वी व्यक्ती आहेत. स्पष्ट बोलण्यास ते भीत नाहीत. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांना पाठिंबा देताना मला आनंदच होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांना दोन गव्हर्नरचा पाठिंबा जाहीर
By admin | Published: February 28, 2016 1:41 AM