भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या काही महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. नासाने त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. पण, यश आलेले नाही. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्याकडून मदत मागितली आहे. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबतीत पोस्ट केली आहे.
मोठी बातमी! काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांचा कब्जा; प्रचंड गोळीबारात भारताचे ८० शांती सैनिक अडकले
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने त्यांना इतके दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून ठेवले होते हे भयानक आहे, असा दावा एलॉन मस्क यांनी केला. नासाने त्यांना त्यांच्या क्रू-9 मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले होते. दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सने काही महिन्यांपूर्वी काम सुरू केले होते, असंही मस्क म्हणाले.
मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "@POTUS ने @SpaceX ला @Space_Station वर अडकलेल्या दोन अंतराळवीरांना लवकरात लवकर घरी आणण्यास सांगितले आहे,"
सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून पृथ्वीवर आणण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले होते. जून २०२४ मध्ये, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय एअर स्पेससाठी रवाना झाले. त्यावेळी ते फक्त १० दिवसांसाठी गेले होते. पण त्यांच्या बोईंकमध्ये अचानक तांत्रिक समस्या आल्या. यामुळे त्यांना परत येण्यात अडचणी आल्या.
स्पेसएक्सला विल्यम्स आणि विल्मोर यांना स्पेसएक्स क्रू-9 कॅप्सूलमधून पृ्थ्वीवर आणण्यास सांगितले होते. दोन्ही अंतराळवीरांना क्रू-9 मध्ये ठेवण्यात आले होते, तर नासाने सप्टेंबरमध्ये स्पेसएक्स ड्रॅगनवर प्रक्षेपित होणाऱ्या चार क्रू सदस्यांपैकी दोघांना काढून टाकले होते. २०२५ मध्ये यासाठी नवीन मोहिम सुरू करण्यात येणार आहे. दोन अंतराळवीरांसाठी जागा ठेवण्यात येणार आहे. यात फक्त एकच अंतराळवीर असणार आहे.