वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. ट्रम्प अध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील. त्यामुळे ट्रम्प पुढील दोन आठवडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकणार नाहीत. दोन आठवड्यांत ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर ज्यो बायडन अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. यानंतरच ट्रम्प यांची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाती सुरू होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारीडोनाल्ड ट्रम्प यांना पोस्ट करण्याची परवानगी देणं अतिशय धोकादायक असल्याचं फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं. ट्रम्प हिंसा भडकावू शकतात. त्यामुळेच आम्ही त्यांची पोस्ट हटवल्याची माहिती त्यांनी दिली. ट्रम्प यांनी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांना घरी जाण्याचं आवाहन करण्यापूर्वी 'आय लव्ह यू' म्हटलं होतं. अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तबट्विटरनंदेखील ट्रम्प यांचं खातं १२ तासांसाठी बंद केलं असून त्यांची तीन ट्विट्सदेखील ब्लॉक केली आहेत. यामध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या समर्थकांशी साधलेल्या व्हिडीओचादेखील समावेश आहे. 'आज घडलेली घटना अभूतपूर्व आहे. वॉशिंग्टनमध्ये भडकलेला हिंसाचार पाहता आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केलेले तीन ट्विट्स हटवणं गरजेचं वाटतं. या ट्विट्समुळे आमच्या नागरिक एकता धोरणाचं उल्लंघन झालं आहे,' असं ट्विटरच्या सुरक्षा विभागानं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना दणका; फेसबुक, इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद
By कुणाल गवाणकर | Published: January 07, 2021 11:30 PM