वॉशिंग्टन- संयुक्त अमेरिकेचा ध्वज हा जगभरात सहजगत्या ओळखला जाणार ध्वज आहे. या झेंड्याला अमेरिकेची ओल्ड ग्लोरी असंही संबोधलं जातं. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच झेंड्याचा विसर पडल्याचा एक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या झेंड्यावर लाल आणि पांढ-या रंगाच्या पट्ट्या आहेत, तसेच झेंड्याच्या एका निळ्या रंगाच्या कोप-यात 50 पांढ-या रंगात तारे दाखवण्यात आले आहेत.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्पबरोबर गुरुवारी एका रुग्णालयात लहानग्यांना पाहण्यासाठी पोहोचले होते. ट्रम्प जेव्हा लहानग्यांसह अमेरिकेच्या झेंड्यामध्ये रंग भरत होते. तेव्हा लाल रंगाच्या जागी ट्रम्प एका पट्टीमध्ये चक्क निळा रंग भरत असल्याचं निदर्शनास आलं. हा फोटो एलेक्स अजहर यांनी 24 ऑगस्ट रोजी ट्विटवर शेअर केला. त्यानंतर अजहर यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रम्प ट्रोल झाले आहेत.तर दुस-या एका चित्रातही ट्रम्प यांनी पहिल्या चुकीची पुनरावृत्ती केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पुन्हा लाल रंगाच्या जागी निळा रंग भरला. त्यानंतर ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प ट्रोल झाले. ट्रोलर्सनी ट्रम्प यांना खडे बोलही सुनावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या शहीद जवानांच्या आठवणी आणि सन्मान देत असताना जाहीर आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा झेंडा विसरले, ट्विटरवर झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 8:21 PM