वॉशिंग्टन - अमेरिकेत या वर्षाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ही निवडणूक पुढे ढकलावी, असा सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना, निवडणुकीत मेल इन सिस्टिमने मतदान होणार आहे. असे असताना ही अमेरिकेच्या इतिहासात सर्वात चुकीची आणि फसवा-फसवीची निवडणूक ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी या विवडणुकीत मतदानादरम्यान घोटाळा होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले, की 'सार्वत्रिक मेल इन व्होटिंगने (नॉट अॅबसेंटी व्होटींग, जे चांगले आहे.) 2020ची निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वा चुकीची आणि फसवणुकीची ठरेल. ही निवडणूक अमेरिकेसाठी लज्जास्पद असेल. निवडणूक तोवर पुढे ढकलावी, जोवर लोक सुरक्षितपणे मतदान करू शकणार नाहीत.'
अमेरिकेत या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, सध्या संपूर्ण अमेरिकेत कोरोना थैमान घालत आहे. कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या दीड लाखच्याही पुढे गेली आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 32,658, कॅलिफोर्नियामध्ये 8,724, फ्लोरिडामध्ये 6,332 आणि टेक्सासमध्ये 5,913 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याशिवाय, अमेरिकेतील महत्वाच्या खेळांच्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर शाळा आणि महाविद्यालये सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरू होणार, की नाही. यासंदर्भातही खात्रीची स्थिती नाही.
अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे. कायद्याप्रमाणे ही निवडणून 3 नोव्हेंबरला होणार आहे. डेमोक्रॅट्सची सत्ता कनिष्ठ सभागृहात आहे. अशात असे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. यापूर्वीच आपल्याला निवडणुकीला सामेरे जाण्यास कसल्याही प्रकारची समस्या नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
दुसऱ्या बाजूला विरोधकांनी म्हटले आहे, की अमेरिकेच्या निवडणुकीत फसवणूक होण्याचा कसल्याही पुरावा नाही. याशिवाय, मेल-इन व्होटिंगची जटिल प्रक्रिया आणखी सोपी बनवण्याची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी