शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली योजना; गाझा पट्टी ताब्यात घेणार अन्..! अनेक मुस्लिम देशांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:08 IST

Donald Trump on Gaza : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठी गोष्ट बोलून दाखवली.

Donald Trump on Gaza : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील अनेक दशके जुने संकट सोडवण्यासाठी एक योजना आखली आहे. यानुसार, अमेरिका गाझा पट्टीवर ताबा मिळवणार असून, येथे राहणाऱ्या किंवा विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनींना शेजारील इजिप्त आणि जॉर्डन देशात आश्रय घेण्यासाठी पाठवणार आहे. "एवढी दशके मृत्यू आणि विनाशाचे प्रतीक असलेली गाझा पट्टी लोकांसाठी अत्यंत वाईट आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे," असे ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत पत्रकार परिषदेत म्हटले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, गाझातील लोकांनी इच्छुक देशांमध्ये जावे. आम्ही गाझा पट्टीवर ताबा मिळवू आणि यावर काम करू. आम्ही याची जबाबदारी घेऊ आणि साइटवर उपस्थित असलेले सर्व धोकादायक बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करू. साइट समतल करू आणि नष्ट झालेल्या इमारती दुरुस्त करू. असा आर्थिक विकास तयार करू ज्यामुळे परिसरातील लोकांना अमर्यादित नोकऱ्या आणि घरे मिळतील, असे ट्रम्प म्हणाले.

काय आहे ट्रम्प यांची योजना?टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मध्य पूर्वेचा रिव्हिएरा बनण्याची क्षमता असलेले गाझा पर्यटन आणि व्यापार केंद्र म्हणून पुनर्बांधणी करण्याची ट्रम्प यांची कल्पना आहे. ते स्वतः रिअल इस्टेट डेव्हलपर होते. या कारणास्तव, या गोष्टीने त्यांच्या भू-राजकीय विचारांवर अनेकदा प्रभाव टाकला आहे. 

नुकसान भरुन काढण्यासाठी बराच वेळ लागेलयुनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) ने म्हटले आहे की, गाझामध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी बराच वेळ लागेल. या युद्धामुळे पाणी व स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. छावण्या आणि आश्रयस्थानांभोवती वाढत्या कचऱ्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विविध शस्त्रे आणि रसायनांमुळे येथील माती आणि पाणी दूषित झाले आहे. एका रिपोर्टनुसार, युद्धामुळे गाझा पट्टीत 50 मिलियन टनांपेक्षा जास्त मलबा जमा झाला आहे. युद्धाचे ढिगारे आणि स्फोटक अवशेष साफ करण्यासाठी 21 वर्षे लागू शकतात. 

अनेक देशांची टीकाइजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगने संयुक्त निवेदन जारी करून अमेरिकेच्या योजनेवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेने असे पाऊल उचलले, तर संपूर्ण क्षेत्राचे स्थैर्य धोक्यात येऊ शकते. याशिवाय संघर्षही वाढू शकतो.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष