वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धावरून चीनला इशारा दिलेला असतानाच आता आपल्या नौदलाला इराणची बोट पाहिल्यास ती उडवून देण्यास सांगितले आहे. ट्विट करत त्यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणच्या नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.विशेष म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू बनले आहेत. अमेरिकेच्या या पावलानंतर इराणनेही अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्यात 80 लोक ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेने सांगितले की, सर्व काही सुरक्षित आहे आणि कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
युद्धाचे ढग! इराणच्या जहाजांनी त्रास दिल्यास ती उडवून द्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या नौदलाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 7:50 PM