Bangladesh Hindu: बांगलादेशात सध्या धार्मिक हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंवर हल्ले होत आहेत. बांगलादेशातील हिंदुंवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर अमेरिकेतून प्रतिक्रिया आली आहे. यूएससीआयआरएफचे (United States Commission on International Religious Freedom) माजी आयुक्त जॉनी मूर यांनी जो बायडेन यांच्या सरकारवर टीका करताना आता डोनाल्ड ट्रम्प येताहेत, असे सूचक विधान केले आहे.
जॉनी मूर यांना बांगलादेशात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल अमेरिकेची भूमिका काय? बायडेन सरकारच्या तुलनेत ट्रम्प सरकार काय वेगळे करेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
यूएससीआयआरएफचे माजी आयुक्त जॉनी मूर यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेतील बायडेन सरकारने बांगलादेशवर जास्त लक्ष दिलं नाही. ही वेळ बांगलादेशातील अल्पसंख्यांकासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. पण, आता ट्रम्प येत आहेत." "डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या चांगल्या टीमसह अध्यक्षपद सांभाळणार आहेत. त्यांची टीम अमेरिकेन मूल्यांची समर्थक आहे आणि भारताला एका सहकाऱ्याप्रमाणे बघते", असे मूर यांनी म्हटलं आहे.
"मी थक्क आहे की, सध्याच्या अमेरिकेतील सरकारने बांगलादेशकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण, सत्य असे आहे की, अमेरिकेतील सरकार आता बदलणार आहे. या सरकारचे परराष्ट्र धोरण चांगले असेल. मी हे म्हणू शकतो की, ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये परत येत आहे आणि अमेरिकेची मूल्ये जोपासणारी त्यांची टीम चांगल्या भविष्यासाठी काम करेल", असे मूर यांनी म्हटले आहे.