वॉशिंग्टन : यावर्षी राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात झालेले दंगे सर्वानाच माहीत आहेत. दंगेखोरांनी दंगे करत सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान केले. एवढंच नाही, तर कोट्यवधींची संपत्तीही त्यांनी जाळून टाकली होती.
ट्रम्प यांनी वापली योगींची आयडिया - दंग्यांमुळे त्रस्त होऊन योगी सरकारने दंगेखोरांचा सामना करण्यासाठी खास आयडिया शोधून काढली होती. दगंलींनंतर योगी सरकारने संबंधित भागांतील सीसीटीव्ही फुटेज बघितले. यानंतर तोंडाला रुमाल बांधून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांचे पोस्टर तयार केले आणि ते शहरातील मुख्य रस्ते आणि चौका-चौकांत लावून नागरिकांना या दंगेखोरांसंदर्भात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर त्यांच्या घरी नोटिसा पाठवण्यात आल्या. ते दंगेखोर आता नुकसान झालेल्या संपत्तीची भरपाई करत आहेत. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्यांनी संपत्तीचे नुकसान केले आहे, त्यांच्याकडून त्याची वसुली केली जाईल.
ट्रम्पदेखील फुटेज काढून करतायत ट्विट - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही, आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्वेत आणि कृष्णवर्णीय नागरिकांनी अनेक शहरांत दंगली केल्या. कोट्यवधींच्या सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे नुकसान केले. आता येथील दंगली थांबल्या आहेत आणि वातावरण शांत झाले आहे. यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ खंगाळून एक डझनहून अधिक दंगेखोरांचे फोटो ट्विट करत, अमेरिन नागरिकांना त्या दंगेखोरांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प सातत्याने दंगेखोरांचे फोटो ट्विट करत आहेत.
गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'
अमेरिकेतील या दंगेखोरांना काहीच सापडले नाही, तेव्हा त्यांनी येथील पुतळ्यांवरच आपला राग व्यक्त केला. येथील अनेक पुतळ्यांचे डोके तोडले गेले, अनेक ठिकाणी दोऱ्या आणि साखळ्या लावून पुतळे पाडले गेले. तर अनेक ठिकाणी पुतळे पाडल्यानंतर त्यांना चपला आणि बुटंही मारण्यात आली.
चर्चाच करायची असेल तर या, 1962पासून आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊद्या; राहुल गांधींवर 'शाह अॅटॅक'
दंगेखोरांनी पाडलेल्या पुतळ्यातं, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अँड्र्यू जॅक्सन, अलबर्ट पाइक तसेच राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील कॉन्फेडरेट जनरल यांच्या पुतळ्यांसह अनेक महान लोकांच्या पुतळ्याचा समावेश होता. हे सर्व पुतळे अशा लोकांचे आहेत, ज्यांचे अमेरिकेच्या इतिहासत काहीना काही योगदान आहे.