वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीननं लावलेल्या नव्या आयातावरील शुल्काच्या नियमावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सरळ सरळ इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतल्या कंपन्या ज्या चीनमध्ये कार्यरत आहेत, त्यांना चीन सोडण्याचं अपील केलं आहे. आम्हाला चीनची गरज नाही. खरं तर त्यांच्याशिवाय आमची चांगली प्रगती होईल. दरम्यान, व्यापारयुद्धामुळे अमेरिकेची प्रगती संथ गतीनं सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्थाही कमकुवत होत आहे.शेअर बाजारांची स्थितीही फारशी चांगली नाही. ट्रम्प म्हणाले, आमच्या देशाला एवढ्या वर्षांत चीनमुळे खर्व डॉलरचं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यांनी वर्षभरात अब्जो डॉलरच्या किमतीची आमची बौद्धिक संपदा लुटली आहे. त्यांना हे सुरूच ठेवायचं आहे. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही चीनमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकी कंपन्यांना तात्काळ तिथून निघून दुसऱ्या देशांचा पर्याय शोधावा, असं सांगितलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 9:24 PM