जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ते पुन्हा सुरु केले होते. परंतू, आजवर ट्रम्प यांनी ट्विटर वापरले नव्हते. आज त्यांनी अडीच वर्षांनी पहिले ट्विट केले आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प रिटर्न्सची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे. तसेच युआरएल ट्विटर असेच ठेवले आहे. अमेरिकेत आज नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निवडणुकीचा निकाल बदलवल्याच्या आरोपात आज ट्रम्प यांना चौथ्यांदा अटक करण्यात आली होती. ट्रम्प हे न्यायालयाच्या आदेशानंतर आज सरेंडर झाले, परंतू मगशॉट देऊन २० मिनिटांत पुन्हा ते बाहेर पडले.
बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांनी तुरुंगाने जारी केलेला मग शॉट वापरत 'निवडणुकीत हस्तक्षेप, कधीच सरेंडर करणार नाही' असे त्या फोटोवर लिहित ट्विटरवर पोस्ट केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ८ जानेवारी २०२१ ला शेवटचे ट्वीट केले होते. आता त्याला अडीच वर्षे झाली आहेत. मे २०२२ मध्ये मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील प्रतिबंध मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते.
मस्कनी पोल घेतलेला...ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला. त्यावर कोट्यवधी लोकांनी आपाल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. पोलमधील निर्णयानुसार मस्क यांनी टॅम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केले होते. पण खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असे सांगण्यात येत होते. अखेर आज ट्रम्प यांना ट्विटरवर येण्याचा मोह आवरलेला नाहीय.