वॉशिंग्टन - महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेकांचे पितळ उघडे पडत आहे. या मोहिमेमुळे देशविदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी #MeToo मोहिमेची खिल्ली उडवली आहे. या अभियानांतर्गत प्रसारमाध्यमांकडून लागू करण्यात येत असलेल्या नियमांमुळे स्वत:वर नियंत्रण ठेवावे लागत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटे आहे. पेनिसिल्वानियातील मध्यावधी निवडणुकीसाठी झालेल्या एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी "द गर्ल दॅट गॉट अवे," या वाकप्रचाराकडे लक्ष वेधले. द गर्ल दॅट अवे हा प्रचलित वाकप्रचार आहे. मात्र #MeToo अंतर्गत मला या वाकप्रचाराचा वापर करण्याची परवानगी नाही. मी या वाकप्रचाराचा वापर करू शकत नाही." इंग्रजीमध्ये द गर्ल दॅट गॉट अवे या वाकप्रचाराचा वापर तुम्ही कुणावरतरी प्रेम केलं असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली. पण तरीही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता. तेव्हा केला जातो. दरम्यान, ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनीही #MeToo अभियानांतर्गत आरोप करणाऱ्या महिलांनी पुरावेही दिले पाहिजेत, असे म्हटले आहे. #MeToo मोहिमेंतर्गत जगभरात अनेक महिला समोर येऊन आपल्या झालेल्या शोषणाला वाचा फोडत आहेत. लैंगिक छळाचा आरोप झालेल्यांपैकी बहुतेक जण मनोरंजन, चित्रपट व प्रसारमाध्यमांतील आहेत. भारतात तर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली #MeToo मोहिमेची खिल्ली, म्हणाले, मीडियामुळे गप्प आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:39 PM