वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने अमेरिकेत कहर केला आहे. येथे मरणारांची आणि कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक आहे. आता याच मुद्यावर विरोधक राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांना निशाण्यावर घेत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनीही विरोधकांना चोख उत्तर देत काही ट्विट केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये ट्रम्प म्हणतात, मला मानणारे लोक बोलतात, की मी अमेरिकेचा सर्वात मेहनती राष्ट्राध्यक्ष आहे.
संबंधित ट्विटमध्ये ट्रम्प म्हणतात, जे लोक मला ओळखतात आणि ज्यांना देशाचा इतिहास माहीत आहे, असे लोक म्हणतात, की मी अमेरिकेचा सर्वात मेहनती राष्ट्राध्यक्ष आहे. मला हे माहीत नाही. पण, मी प्रचंड मेहनत करतो आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीच्या साडेतीन वर्षांच्या काळात मी हे सिद्धही केले आहे.
याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात करण्यासाठी काही सल्लेही दिले होते. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. यात ट्रम्प यांनी डेटॉल आणि लायझॉलनेही कोरोना व्हायरस बरा होतो, असे ते म्हणाले होते. यानंतर अनेकांनी या पद्धतीचा अवलंबही केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत लोकांनी कॉमन सेंसदेखील वापरावा, असे म्हटले होते.
सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. तर जवळपास 55 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प विरोधकांच्या निशान्यावर आहेत.
CoronaVirus : देशात 24 तासांत 1396 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 22.17 टक्क्यांवर