तेहरान - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने शुक्रवारी हत्या केली. सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली असून, सुलेमानींच्या हत्येस जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या सैन्यदलालाच इराणने दहशतवादी घोषित केले आहे. त्यानंतर कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
इराणमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर 12 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इराणीयन रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं (आयआरजीसी) दिली आहे. या वृत्ताला अमेरिकेनेदेखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आहे. 'ऑल इज वेल. क्षेपणास्त्र हल्ल्यातील नुकसानीचा आढावा घेत आहोत' असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'सर्व काही ठीक आहे. इराणने इराकमध्ये असलेल्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागलं आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यातील नुकसानीचा आढावा घेत आहोत. आतापर्यंत सर्व ठीक आहे. आमच्याकडे जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्य आहे' असं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी देखील एक ट्विट केलं आहे. 'युद्ध करण्याचा हेतू नाही; नागरिकांच्या सुरक्षेसाठी हल्ले' असं ट्विट जवाद जरीफ यांनी केलं आहे.
अमेरिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्या हत्येचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यावेळी इराणनं दिला होता. यानंतर आता इराणनं अमेरिकेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या हल्ल्यात अमेरिकेचे 30 जवान मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
युक्रेनचं विमान इराणमध्ये कोसळलं; 180 जणांचा मृत्यू
धक्कादायक... ऑस्ट्रेलिया सरकार १० हजार उंटांना गोळ्या झाडून ठार करणार!
JNU Attack: नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल
ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय