वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला. त्यांनी फ्लोरिडा आणि इलिनॉय येथील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. याचबरोबर त्यांच्या पारड्यात १२७६ डेलिगेट्स झाले आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या विजयामुळे ट्रम्प यांची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाकडून निश्चित मानली जात आहे.
ट्रम्प यांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख रोना मॅकडॅनिअल यांनी ट्विट करून ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पक्षाकडून अधिकृत उमेदवार बनल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. दोन्ही ठिकाणी ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यासाठी झगडावे लागले नाही.
मॅनडोनाल्ड यांनी त्यांचा पक्ष एकत्र असल्याचे सांगितले. प्रचार वेगाने सुरु आहे. आम्ही पुढील चार वर्षांसाठी पुन्हा तयार आहोत. आता ट्रम्प यांना डेमोक्रेट्स पक्षाच्या प्रारंभिक निवडणुका जिंकलेल्यांशी लढावे लागणार आहे. डेमोक्रेटमधून जो बिडेन आणि बर्नी सँडर्स यांच्यामध्ये स्पर्धा आहे. यामध्ये बिडेन पुढे आहेत.
२०१६ च्या तुलनेत ट्रम्प यांनी आधीच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या वेळी मेच्या शेवटी उत्तरी डकोटा जिंकल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. ट्रम्पनी २०१७ मध्येच या निवडणुकीचा प्रचार सुरु केला होता.
अमरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बिडेन यांनी चार राज्यांमध्ये विजय मिळविला आहे. यामध्ये वॉशिंग्टन, फ्लोरिडा, इलिनॉय आणि एरिझोना या संघराज्यांचा समावेश आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण 3979 सदस्य आहेत. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना 1991 सदस्यांचा पाठिंबा गरजेचा आहे. बिडेन यांना 1147 सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे. यामुळे त्यांना 844 सदस्यांची गरज आहे. तर सँडर्स यांना 861 सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे. तुलसी गबार्ड यांना केवळ दोनच सदस्यांचे समर्थन मिळालेले आहे.