ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 01 - अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र यावेळी आपल्या पत्नीमुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांची पत्नी मेलनिया ट्रम्पचे न्यूड फोटो न्यूयॉर्क टाईम्सने छापले आहेत. मॉडेल असणा-या मेलनिया यांनी मॉडेलिंगच्या दिवसामध्ये हे फोटोशूट केलं होतं. न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या अंकात हे फोटो छापल्याने ट्रम्प आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास मेलनिया ट्रम्प फर्स्ट लेडी म्हणून ओळखल्या जातील. आणि असे न्यूड फोटो देणारी अमेरिका राष्ट्राध्यक्षाची पहिलीच पत्नी असेल, अशी कंडी ट्रम्प यांचे विरोधक पसरवत आहेत.
Today's cover: Melania Trump's girl-on-girl photo shoot revealed https://t.co/QUEjkxZnXgpic.twitter.com/38p82c0MiM— New York Post (@nypost) August 1, 2016
मेलनिया ट्रम्प यांनी 1995 मध्ये मॅनहट्टम येथे 'मॅक्स' या फ्रेंच मॅगझिनसाठी हे फोटो शूट केले होते. समलैंगिक थीमवर आधारित हे न्यूड फोटोशूट अॅले दे बॅसेविल्ले या फ्रेंच फोटोग्राफरने शूट केले होते. 1996 मध्ये मॅक्स मॅगजिनने आपल्या अंकात हे फोटो प्रसिद्ध केले होते. यामधील काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले, तर काही तसेच राहिले. 2006 मध्ये हे मॅगझिन बंद झालं. न्यूयॉर्क टाईम्सने मात्र हे सर्व फोटो आपल्या अंकात प्रसिद्ध केले आहेत.
शूटदरम्यान मेलनिया यांच्या अंगावर एकही कपडा नाही आहे. त्यांनी फक्त हिल्स घातल्या आहेत. 'मेलनिया यांच व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. त्या माझ्याशी चांगल्या वागत', असं फोटोग्राफर अॅले दे बॅसेविल्ले सांगतो. 'हे न्यूड फोटो देताना मेलनिया यांना अजिबात अस्वस्थ नव्हत्या, त्यांनी निर्धास्तपणे फोटो दिल्याचंही', बॅसेविल्लेने सांगितलं आहे. 'महिलेचं सौंदर्य आणि स्वातंत्र्य दाखवणं महत्वाचं आहे. मला या फोटोंबद्दल खूप अभिमान आहे. या फोटोंमधून मेलनिया यांच्या सौंदर्य साजरं केलं जात असल्याचंही', अॅले दे बॅसेविल्ले याने म्हटलं आहे.
मेलनिया मॉडेलिंग करत असताना नुकतीच न्यूयॉर्कमध्ये आल्या होत्या, तेव्हा हे शूट करण्यात आलं होतं. अनेकदा फक्त व्यवसायिक कामांसाठी त्यांना घेतलं जात होतं, त्यानंतर कॅमल सिगरेटच्या जाहिरातीतही त्या झळकल्या होत्या.
या फोटोंबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता, 'मेलनिया एक यशस्वी मॉडेल होती, आणि तिने अनेक फोटो शूट केले होते. मी मेलनिया यांना ओळखण्याआधी युरोपमधील एका मॅगजिनसाठी त्यांनी हे फोटो शूट केलं होतं. युरोपमध्ये असे फोटो काढणं नवीन नाही, आणि फॅशनेबल आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिली आहे.
1998 मध्ये एका फॅशन शोच्या पार्टीत डोनाल्ड ट्रम्प यांची आणि मेलनिया यांची ओळख झाली होती. 2005 मध्ये दोघेही फ्लोरिडामधील बीचवर विवाहबद्ध झाले होते.