इस्लामाबाद : कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या पाकिस्तानात एक अजब घटना घडली आहे. येथे जुगार खेळल्याच्या आरोपावरून थेट एका गाढवालाच अटक करण्यात आली आहे. सांगण्यात येते, की पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली. याशिवाय आठ संशयित लोकांनाही अटक करण्यात आली आहे. या गाढवाचे नावही एफआयआरमध्ये टाकण्यात आले आहे.
रहीम यार खान भागातील एसएचओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर संशयितांबरोबर गाढवाचेही नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी गाढवाला पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून 1 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. त्यांनी सांगितले, की हे जुगारी गाढवाच्या शर्यतीसाठी पैसे लावत होते. पोलिसांची ही कारवाई केवळ संबंधित भागातच नाही, तर संपूर्ण सोशल मीडियामध्येच चर्चेचा विषय झाली आहे.
पोकिस्तानी पोलिसांच्या या कारवाई सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. लोकही या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन