इस्लामाबाद - २०२३-२४ या वर्षात पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत १.७२ टक्क्यांनी वाढ होऊन ती ५९ लाखांवर पोहोचली आहे. त्या देशाच्या २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानातील पशुधनाचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या पीएमएल (एन) नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या पीपीपीने सरकारवर वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या वादामुळे पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडी सरकारच्या मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
५.७५ कोटी गुरेढोरे, ४.६३ कोटी म्हशीपाकिस्तानच्या ग्रामीण भागांमध्ये राहाणारे सामान वाहून नेण्यासाठी गाढवाचा उपयोग करतात. तेथील गाढव, घोडे, खेचर हे पशू त्या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्या देशाचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी पशुधनाबाबत आणखी माहिती आर्थिक सर्वेक्षणात दिली आहे. पाकिस्तानात ५.७५ कोटी गुरेढोरे, ४.६३ कोटी म्हशी, ३.२७ कोटी मेंढ्या, ८.७ कोटी बकऱ्या व बकरे आहेत. गेल्या आर्थिक वर्षात उंटांची संख्या ११ लाखांवरून १२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
८० लाख कुटुंबांचे संसार... nगाढव, उंट, घोडे, खेचर, गुरेढोरे, म्हशी, मेंढ्या, बकरी-बकरे हे प्राणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या पशुधनाचे संवर्धन व त्यांच्याकडून करून घेण्यात येणारी कामे यातून आर्थिक उलाढालींवर सुमारे ८० लाख कुटुंबांचे संसार चालतात. nयेथील पशुधनाचे एकूण मूल्य २०२२-२३ मध्ये ५५८७ अब्ज रुपये होते. ते २०२३-२४ मध्ये ५८०७ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे.
इम्रान खान सरकारशी चर्चा करणारआपल्या जुन्या भूमिकेतून माघार घेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय तणाव कमी करण्यासाठी सरकारशी चर्चेला हिरवा कंदील दिला. यापूर्वी त्यांनी सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला होता. पीटीआयने सरकारशी चर्चा सुरू करावी, असे कोर्टाने म्हटल्यानंतर इम्रान यांचे मत बदलले आहे.