टेम्पे (अमेरिका) : अनेक लोकांना एकटे राहणे आवडते. मात्र, एकटे राहण्यामुळे मोठा फटका बसत असून, मृत्यू येण्याचाही धोका असल्याचे नवीन संशोधनात समोर आले आहे. अमेरिकेतील ‘अमेरिकन सायकोलॉजिस्ट’ या प्रतिष्ठित मासिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले नागरिक आणि १९६५ ते १९८० दरम्यान जन्मलेल्या नागरिकांना सध्या सर्वाधिक एकटेपणा भासत आहे. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्येही एकटेपणाचा फटका बसत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
२००७ ते २००९ अखेरपर्यंत आलेल्या मंदीनंतर अमेरिकेतील मध्यमवयीन नागरिकांना वाईट मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा सामना करावा लागला.२०२३ मध्ये एका नियतकालिकाने एकटेपणाची समस्या महामारी बनेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
जबाबदारी मोठी, आजारही वाढलेसंशोधकांनी २००२ ते २०२० पर्यंत जन्मलेल्या अमेरिका आणि १३ युरोपीय देशांमधील ५३ हजारांपेक्षा अधिक मध्यमवयीन नागरिकांच्या डेटाचा अभ्यास केला. दर दोन वर्षांनी एकटेपणाबाबत काय समस्या निर्माण झाल्या याबद्दल डेटात माहिती देण्यात आली. युरोपियन देशांतील मध्यमवयीनांच्या तुलनेत अमेरिकन मध्यमवयीन नागरिकांना एकटेपणाचा सर्वाधिक अनुभव येत आहे. अमेरिकेमधील मध्यमवयीन नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेही यावरून आढळून आले आहे. असे असले तरी वृद्ध पालक आणि त्यांची मुले या दोघांचीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यातच अनेक युरोपीय देशांच्या तुलनेत, अमेरिकेतील प्रौढांत सध्या नैराश्य, जुनाट आजार, वेदना आणि अपंगत्वाचे प्रमाण अधिक आहे.
एकटेपणा का धोकादायक? nएकटेपणा असल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात.nएकटेपणा हा धूम्रपानाइतकाच धोकादायक आहे.nव्यक्तीला आजार, नैराश्य, गंभीर आजार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो.nएकटेपणा ही जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या मानली जाते.nएकटेपणा कमी करण्यासाठी लोकांमध्ये सामाजिक बंध दृढ होणे आवश्यक आहे.