वॉशिंग्टन: जागतिक स्तरावर कोरोनाचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील बहुतांश देशांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक आणि संसर्ग होणारा असून, अमेरिकेमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. यातच आता डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक तसेच घातक व्हेरिएंट येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या व्हेरिएंटवर लसीही उपयुक्त ठरू शकणार नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. (dr anthony fauci warns coronavirus may have more deadly variant than delta and may deceive vaccines)
अमेरिकेतील संसर्ग विशेषज्ञ आणि सरकारचे कोरोना सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी यासंदर्भात अमेरिकेसह अन्य देशांनाही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने कोरोना संसर्ग होत आहे, तो पाहता कोरोना अधिक धोकादायक आणि घातक स्वरुप धारण करू शकतो, असे फाउची यांनी म्हटले आहे.
काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले
लसीकरणाच्या कमतरतेमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक
अमेरिकेत कोरोना लसीकरण आणखी मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. ते कमी प्रमाणात होत असल्याने कोरोना आणि व्हेरिएंटचा संसर्ग अधिक होत आहे, असा दावा डॉ. फाउची यांनी केला आहे. आगामी काळात डेल्टापेक्षाही घातक व्हेरिएंट येऊ शकतो. तसेच कोरोनाच्या लसीही त्यावर उपयोगी ठरणार नाही, असा धोक्याचा इशाराही डॉ. फाउची यांनी दिला आहे. कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटशी सामना करण्यासाठी तयार राहावे, असे सांगत आता लसीकरणावर अधिकाधिक भर द्यायला हवा. नागरिकांनीही वेळ आहे, तसा लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जंगलातील आगीप्रमाणे व्हेरिएंट पसरणार
भारतात कहर माजवणारा कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आता अमेरिकेत मोठ्या वेगाने पसरत आहे. त्याशिवाय अल्फा, बीटा व्हेरिएंटदेखील आहेत. अर्जेंटिना आणि चिलीमध्ये लांब्डा व्हेरिएंटही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांवर संकट निर्माण करत आहे. आता येणाऱ्या काळात कोरोना व्हायरसचं असा व्हेरिएंटनं येणार असून तो या सर्वांपेक्षा अधिक धोकादायक असणार आहे असा रिपोर्ट समोर आला आहे. कोरोनाचा असा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. जो जंगलातील आगीप्रमाणे व्हायरस पसरू शकेल, असा दावा या रिपोर्टमधून तज्ज्ञांनी केला आहे. भीती ही आहे की, हा व्हेरिएंट संक्रमित लोकांच्या जुन्या आकडेवारीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून टाकेल.
Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!
दरम्यान, रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, मोठ्या संख्येने लोकांनी लस घेण्यापासून नकार दिल्याने ते कोरोना म्यूटेशन लॅब बनतील. डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण पाहता आगामी काही महिन्यांमध्ये यापेक्षा धोकादायक व्हेरिएंट येऊ शकतो. आता फक्त मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगने कोरोना व्हायरसपासून बचाव करणे कठीण आहे. या समस्येवर लस समाधान आहे, परंतु ती न घेणाऱ्यांमुळे एक मोठी बाधा उभी राहू शकते, असे सांगितले जात आहे.