Dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी ३० दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर सरकारनं हा कालावधी ४५ दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी करण्यात आली आहे. आता नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात येणार आहे. (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.) पॅनलनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी हे उचलण्यात आलेलं पाऊल म्हणजे योग्य निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. "कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं गेलं ही उत्तम पद्धत आहे. भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे आणि अशा परिस्थितीत अधिकाधिक लोकांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करणंही आवश्यक आहे. यामुळे ही पद्धत अगदी योग्य आहे असं माझं मानणं आहे," असं डॉ. अँथनी फाउची म्हणाले.
कोवॅक्सिनच्या कालावधीत बदल नाहीकेंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे.