रशियावर ड्रोन हल्ले; विमानतळ बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:19 AM2023-07-31T09:19:18+5:302023-07-31T09:19:44+5:30
मध्यरात्री ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याने शहरात मोठा गोंधळ उडाला होता.
मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सातत्याने तीव्र होत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर आता युक्रेननेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनने शनिवारी रात्री पुन्हा एकदा रशियाची राजधानी मॉस्कोवर ड्रोनने हल्ला केला. यात दोन इमारतींचे नुकसान झाले. हल्ल्यामुळे शहरातील विमानतळही बंद ठेवावे लागले.
मध्यरात्री ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याने शहरात मोठा गोंधळ उडाला होता. ड्रोन हल्ल्यात दोन इमारतींचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. काही ड्रोन पाडण्यात रशियाला यश आले. या हल्ल्याची जबाबदारी युक्रेनने घेण्यास नकार दिला आहे. एका महिन्यापूर्वीही असाच ड्रोन हल्ला करण्यात आल्यामुळे विमानतळ बंद ठेवावे लागले होते. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता.
युक्रेनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर का देणार नाही? काही लोक म्हणतात की, शांतीने मार्ग काढावा. आम्ही तो नाकारलेला नाही. आम्ही याआधीही म्हटले आहे की, आम्ही शांतता चर्चा नाकारत नाही. - व्लादिमीर पुतिन