दुष्काळातही भरतो रासायनिक सां
By admin | Published: May 05, 2016 7:48 PM
डपाण्याचा तलाव
डपाण्याचा तलावकुरकुंभ येथील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न गंभीरकुरकुंभ : दौंड तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे तलाव कोरडे पडले असले तरी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातून निघणार्या सांडपाण्याचा मात्र सुकाळ दिसत आहे. डोंगरांच्या खालील बाजूस पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले ताली सांडपाण्यामुळे भरलेली दिसतायेत.एकीकडे पाण्याची आवश्यकता भासत असताना दुसरीकडे मात्र पाण्याचा झराच वाहतोय, मात्र तो रासायनिक सांडपाण्याचा आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील विविध रासायनिक प्रकल्पातून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यात येत असल्याचे वारंवार सांगण्यात येते; मात्र याठिकाणचे वास्तवअत्यंत वेगळे असून रासायनिक सांडपाण्याचा उपद्रव राजरोसपणे होताना दिसत आहे. मात्र यावर नियंत्रण अथवा उपाय करताना दिसून येत नाही.रासायनिक प्रकल्पातील बर्याच नामांकित प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचे उत्पादन केले जाते; मात्र यामधून निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विचार न करता सर्रासपणे हे पाणी मोकळ्या जागेत अथवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी रात्रीअपरात्री सोडण्यात येते. त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद व परिसरातील पाणी दूषित झाल्याचे पाहावयास मिळते.चौकट...........* दूषित पाणी मोकळ्या जागेतकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांनी एकत्र येऊन रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन केले आहे, मात्र या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी कुठे सोडणार, याबाबत निर्णय होत नसून यासाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी हे पाणीदेखील औद्योगिक क्षेत्रामधील मोकळ्या जागेमध्ये सोडण्यात येत आहे.* सांडपाण्याबाबत प्रश्नचिन्हकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास बर्याच प्रकल्पाने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सहभाग घेतला आहे, मात्र या सामूहिक केंद्रातून सोडण्यात येणार्या पाण्यावरच प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे रासायनिक सांडपाणी प्रत्यक्ष सोडले काय किंवा सामूहिक प्रक्रिया केंद्रातून सोडले काय, एकच होणार आहे. त्यामुळे सामूहिक प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली सर्रास सांडपाणी सोडण्याचा उपक्रम येथील रासायनिक प्रकल्पांनी मांडला आहे.फोटो ओळ : कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात ऐन दुष्काळातदेखील रासायनिक सांडपाण्यामुळे भरलेल्या ताली.05052016-िं४ल्लि-12-------------