नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये 6.41 कोटीं रुपयांची लॉटरी लागली आहे. टॉम एरेक्कल मणी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बंगळुरुचा राहणार आहे. ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये आतापर्यंत 124 भारतीय वंशाचे लोक मालामाल झाले आहेत. ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ची सुरुवात 1999मध्ये झाली आहे. टॉम एरेक्कल मणी व्यतिरिक्त 124 भारतीयांनी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये प्रत्येकानं एक मिलियन डॉलर जिंकले आहेत. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार टॉम एरेक्कल मणी यांचा तिकीट नंबर 2190 लॉटरीमध्ये लागला. आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल या लॉटरीची सोडत काढण्यात आली
आंतरराष्ट्रीय कार्ड कंपनीमध्ये काम करत असलेलेल्या 38 वर्षीय मणी यांनी गेल्यावर्षी ते तिकीट खरेदी केलं होतं. मिळालेल्या वृत्तानुसार, लॉटरी लागल्याचे समजताच टॉम एरेक्कल मणी यांचा आनंदाला पारा उरला नाही. मणी म्हणाले की, मला समजत नाही मी काय कारु, मी खूप आनंदी आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाहीत. माल आजूनही यावर विश्वास बसत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात म्हत्वाची बातमी देण्याबद्दल ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ला मी धन्यवाद म्हणतो.
दरम्यान, दुबई: 8 जानेवारी रोजी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीसही भारतीय वंशाच्या हरिकृष्णनव्ही. नायर यांनी जिंकले होते. नायर यांना बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम मिळाली होती. या लॉटरीची तिकिटे आॅनलाइन किंवा विमानतळांवर खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांचे नशीब एवढे बलवत्तर की, त्यांना अशा मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले. एवढे मोठे बक्षीस लागल्याचे समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची व नंतर आनंदाची होती! एकटे नायरच नव्हेत, तर इतर चार भारतीयांनाही या लॉटरीने साथ दिली. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.