सिडनी : जी-20 देशांच्या व्यापार परिषदेवर मलेशियन विमान अपघाताचे सावट होते. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात 16 ते 18 जुलै या काळात झालेल्या या परिषदेत आर्थिक वाढीवर चर्चा केली जाणार होती; मात्र रशिया समर्थक युक्रेनियन बंडखोरांनी कथित क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे विमान पाडल्याच्या आरोपाने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले.
अपघाताच्या अनुषंगाने संघटनेचे सदस्य असलेल्या रशिया-अमेरिका यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ऑस्ट्रेलियन व्यापारमंत्री अॅँड्रय़ू रॉब यांनी शुक्रवारी आपल्या रशियन समपदस्थ डेनिस मानतुवरे यांच्याकडे युक्रेनियन बंडखोरांना रोखण्याची मागणी केली होती.
रशिया या घटनेची संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे स्वतंत्र आणि तातडीने चौकशी करण्यास सर्वतोपरी मदत करील, असा विश्वास त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. रशियन व्यापारमंत्र्यांनी या अपघाताच्या संयुक्त राष्ट्रामार्फत होणा:या चौकशीला साहाय्य करण्याची हमी देण्याची मागणी त्यांनी केली. बंडखोरांच्या घातपाती कारवाया रोखण्यासंदर्भात त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे ते म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे, अनेक देशांप्रमाणोच ऑस्ट्रेलियानेही काही रशियन व युक्रेनियन नागरिकांवर र्निबध आणि प्रवासबंदी लादली आहे. आगामी नोव्हेंबरमध्ये जी-2क् देशांच्या राष्ट्रप्रमुखांची ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात शिखर परिषद होणार आहे. युक्रेनमधील तणाव आणि विमान अपघातामुळे या परिषदेसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना आमंत्रित केले जाण्यावरही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. या विमान अपघातात 298 जण मारले गेले. यात 28 ऑस्ट्रेलियन प्रवाशांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)