वॉशिंग्टन : ‘द्वेषाच्या राजकारणाचा’ विरोध करण्यासाठी शेकडो निदर्शक सभास्थळी जमा झाल्याने, तसेच समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष सुरू झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने डोनॉल्ड ट्रम्प यांना शिकागोमधील त्यांची प्रस्तावित रॅली रद्द करावी लागली.अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी ट्रम्प यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ते आता एक प्रमुख दावेदार बनले आहेत. मात्र त्यांचे राजकारण ‘द्वेषा’चे असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करीत आहेत.ट्रम्प यांनी प्रारंभी शिकागो पॅव्हिलियनच्या युनिव्हर्सिटी आॅफ इलिनॉईस येथे आपली रॅली उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण नंतर सुरक्षाविषयक काळजीमुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.निदर्शने झाल्याने एखाद्या नेत्याला रॅली रद्द करावी लागण्याची अमेरिकेतील ही एक अभूतपूर्व घटना आहे.
गोंधळामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली रद्द
By admin | Published: March 13, 2016 3:58 AM