पॅरिस : गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवरील करवाढीच्या निषेधार्थ सरकारविरोधी हिंसक आंदोलन चांगलेच चिघळले आहे. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे फ्रान्समध्ये भयानक अशांतता पसरली असून, दंगल उसळू नये, म्हणून सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा विचार आहे.आतापर्यंतच्या हिंसाचारात सुरक्षा दलाच्या २३ जणांसह १३३ जण जखमी झाले असून, ४१२ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी काही निदर्शकांनी मध्य पॅरिसमध्ये रस्त्यावर उतरून वाहने आणि इमारतींची जाळपोळ करून तोडफोड केली, तसेच दुकानेही लुटण्याच्या घटना घडल्याने सरकारविरोधी निदर्शने चिघळली. या हिंसक आंदोलनामुळे फ्रान्स १९६८ नंतरच्या भीषण अशांततेला सामोरे जात असून, मॅक्रॉन यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले आहे.आधीच पेट्रोल-डिझेल महाग असताना, त्यावरील कर वाढविण्यात आल्याच्या विरोधात मोठ्या संख्येने लोक पिवळा अंगरखा, जाकीट घालून रस्त्यावर उतरल्याने, पोलीस आणि निदर्शकांत चकमकी झाल्या. रविवारी सकाळीही निदर्शकांनी दक्षिण फ्रान्सस्थित नरबॉनजीकचा एक टोलनाका पेटवून दिला, तसेच पूर्व फ्रान्समधील लिआॅननजीक उत्तर-दक्षिण प्रमुख मार्गावर रस्तारोको केला. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरासोबत पाण्याचा मारा केला.>संतप्त आंदोलकांनी १९० ठिकाणीआगी लावल्या. रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने पेटवून दिली, शिवाय ५ इमारतींनाही आग लावली.>किती आहेत इंधनाचे दर?फ्रान्समध्ये डिझेलवर चालणाऱ्या कार सर्वाधिक आहेत. डिझेलच्या किमती गेल्या वर्षभरात २३ टक्के वाढल्या आहेत. तिथे १.५१ युरो (१२० रुपये) प्रति लीटर एवढा डिझेलचा भाव आहे. सरकारने त्यावर आणखी कर वाढविला आहे आणि १ जानेवारीपासून त्यावर आणखी कर लावला जाणार आहे.हिंसाचार खपवून घेणार नाही : राष्टÑाध्यक्ष मॅक्रॉनकोणत्याही स्थितीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. अधिकाºयांवर हल्ले, व्यापार ठप्प करणे, वारसास्थळांचा अनादर करण्याचे प्रकार धक्कादायक आहेत. हिंसाचार करणाºयांना सुधारणा नको आहेत. फक्त अराजकता हवी. दोषींना न्यायालयाच्या पिंजºयात आणले- इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे अध्यक्ष.
पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे फ्रान्स पेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:37 AM