टोकियो :
कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी घटत्या लोकसंख्येवर देशाला ‘करो किंवा मरो’ असा इशारा दिला आहे. यावरून परिस्थिती किती चिंताजनक असेल, याचा अंदाज लावता येतो. पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की, आता सरकार लोकसंख्या वाढीशी संबंधित सूचनांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करेल. सुमारे १२.५ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गेल्या वर्षी आठ लाख मुले जन्माला आली. मात्र, ही संख्या कमी आहे. वृद्धांची संख्या वाढल्याने येथे कामगारांची संख्या कमी होत असून, अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे.आकडेवारीनुसार, जपानमधील ६५ पेक्षा अधिक वय असलेली लोकसंख्या २८ टक्क्यांवर पोहोचली असून, तो या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमाकांवर मोनॅको हा लहान लहान देश असून, येथे वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक आहे.